अमिताभ बच्चन आपल्या चीतपारीचीत अंदाज, आपला दमदार आवाजासाठी सर्वश्रुत आहेत. त्यांच्या
भाषणातील प्रत्येक शब्द ऐकण्यासाठी प्रेक्षकांचे कान आतुरलेले असतात. निमित्त होते बाळासाहेब ठाकरे
ह्यांच्या जीवनीवर आधारित “ठाकरे” हा नवीन चित्रपटाच्या टीझर रीलीझिंग कार्यक्रमचे. ह्या कार्यक्रमात
त्यांनी त्यांच्या आयुष्यातील त्यांच्या आयुष्याबद्दल एक महत्वपूर्ण घटना सांगितली. कुली चित्रपटाच्या
शुटींग दरम्यान एक मोठा अपघात झाला होता. मी जीवन मरणाच्या रेषेवर उभा होतो, सारा देश
माझ्यासाठी प्रार्थना करत होता. मी बंगलोर च्या हॉस्पिटल मध्ये अर्धशुद्ध अवस्थेत होतो. मला मुंबईला
हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. पाऊसामुळे कुठलीही रुग्णवाहिका मिळत नव्हती आणि माझ्यासाठी
शिवसेनेची रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. अस झालं नसत तर माझ्यावर खरच बिकट
परिस्थिती ओढवली असती.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews